पूर्ण वर्षात एकूण चार नवरात्री येतात त्यात दोन गुप्त नवरात्री असतात ज्या ध्यान साधना वाढीसाठी असतात. दिलेले उपाय हे पूर्णतः वैदिक असुन ते कोणत्याही नवरात्रीत करता येतात.
पूर्ण वर्षात एकूण चार नवरात्री येतात त्यात दोन गुप्त नवरात्री असतात ज्या ध्यान साधना वाढीसाठी असतात. दिलेले उपाय हे पूर्णतः वैदिक असुन ते कोणत्याही नवरात्रीत करता येतात.
नवरात्रीत ९ दिवस दिवा लावल्यावर त्या दिव्याखाली इच्छा (एकच) लिहून ठेवणे आणि गणपती बीज मंत्र १०८ वेळा बोलणे.
गणपती बीज मंत्र- "ॐ गं गणपतये नमः "
आयुष्यात निराशा असेल तर
साहित्य - ७ वेलची , खडी साखर चा नैवेद्य ९ दिवस रोज (नवरात्रीत) घट ठेवले असतील तर घरी अन्यथा दुर्गा देवी मंदिरात ठेवणे.
बाकी दिवसात दुर्गा देवी मंदिरात जाऊन कोणत्याही दर शुक्रवारी करावे.
किंवा
११ कॉइन आणि सफेद मखाने (म्हणजे कमळाच्या बिया) दर शुक्रवारी दान करणे.
स्किन प्रॉब्लेम साठी
दुर्गा देवी मंदिरात नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी १ गुलाब अर्पण करून महागौरी मंत्र १०८ वेळा म्हणणे.
महागौरी: "देवी पार्वती " - मंत्र: "ॐ देवी महागौर्याय नमः"
किंवा
१ गुलाब शुक्ल पक्ष अष्टमी दिवशी दुर्गा देवी मंदिरात अर्पण करणे सोबत मंत्र जाप करणे. कोणत्याही महिन्यात अष्टमीला दुर्गा देवी मंदिरात सकाळी ११ च्या आधी हा उपाय करू शकता.
नोकरीसाठी (फक्त नवरात्रीत कोणत्याही दिवशी)
गोड पान किंवा पान विडा त्यावर वेलची, लवंग ठेवून, दुर्गा देवी मंदिरात संध्याकाळी अर्पण करणे आणि मनातली प्रार्थना करणे.
कर्ज मुक्तीसाठी (नवरात्रात रोज म्हणजे ९ दिवस रोज सकाळी घरी कलशासमोर )
१ पान घेऊन बोटाने त्यावर " ह्रीं " बीजमंत्र सफेद चंदनाने लिहिणे, ९ दिवस सतत करणे. नवमी दिवशी म्हणजे ९ व्या दिवशी संध्याकाळी आरती झाल्यावर सगळी पान एकत्र करून लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधुन लॉकर मध्ये ठेवणे. जर कोणत्याही दिवशी राहील किंवा उशिरा सुरुवात केली तर जे दिवस राहिले ते शेवटच्या दिवशी अर्पण करणे .
आर्थिक तंगी (नवरात्रीतील मंगळवारी )
१ पान घेऊन एकावर ११ लवंग आणि ११ वेलची यांचा विडा मंगळवार संध्याकाळी हनुमान मंदिरात अर्पण करणे आणि मनातील आर्थिक इच्छा बोलणे आणि १ पानावर ११ गुलाब पाकळ्या ठेवून दुर्गा देवी मंदिरात मंगळवार संध्याकाळी अर्पण करणे आणि मनातील आर्थिक इच्छा बोलणे.
निगेटिव्हिटी घालवण्यासाठी / ब्लॅक मॅजिक असेल तर उपाय (नवरात्रीत ६ किंवा ७ वा दिवस फक्त दुर्गा देवी मंदिरात )
१ पान त्यावर २ केसर ठेवणे, दुर्गा देवी स्तोत्र आणि १०८ नामावली बोलून प्रार्थना करणे आणि दुर्गा देवीला मंदिरात अर्पण करणे.
ज्यांचं लग्न होत नाही (३ रा दिवस नवरात्री) सकाळी ९ च्या आधी किंवा नंतर कोणत्याही सोमवारी करू शकता.
आंब्याच्या पानावर हिरव्या बाजूला हळदीचा लेप लावून त्यावर कुंकुने स्वस्तिक काढून अख्खे तांदूळ ठेवून महादेव मंदिरात पिंडीवर वाहणे आणि लग्नाबद्दलची इच्छा बोलणे. सॊबत घरी रोज नवग्रह मंत्र ५१ वेळा केल्यास ४ महिन्यात इच्छा पूर्ण होईल.
किंवा
रोज ११ वेळा गुरु, मंगळ, चंद्र, बुध, शुक्र ग्रह बॅलन्स करण्यासाठी त्यांचे बीज मंत्र जप सुद्धा करू शकता.
कृपया नोंद असावी की हा उपाय फक्त ज्यांचं लग्न होत नाही त्यांच्यासाठीच आहे, इच्छित स्थळा बद्दल हा उपाय नाही.
धनप्राप्ति (नवरात्रीत कधीही) किंवा कोणत्याही शुक्रवारी संध्याकाळी करावे (६ महिन्यानंतर बदलणे)
साहित्य - पिवळा कपडा , ९ भीमसेन कापूर, कुंकु, ९ लालपिवळे सुती धागे (कलावा),९ लाल फुल
दुर्गा देवी कवच ध्यान करत हातात कापूर, ९ धाग्यांना व फुलांना कुंकू लावुन पिवळ्या कपड्यात ठेवणे नंतर तुपाचा दिवा लावुन दुर्गा देवी पाठ करणे.
कुंकू लावलेले ९ धाग्यांनी त्या कपड्याला बांधुन घेऊन, मुख्य दरवाज्याच्या डाव्या बाजूला बांधणे (बाहेरून येताना डावी बाजू), जर बाहेर ठेवणे शक्य नसेल तर आतल्याबाजूने उजव्या बाजूला लावणे (आतुन बाहेत जाताना उजवी बाजू)
धन आकर्षणसाठी - नवरात्रीत करणे (नवरात्री मध्ये पूर्ण ९ दिवस देवीसमोर ठेवणे )
साहित्य - २१ अभिमंत्रित गोमती चक्र
गोमतीचक्र अभिमंत्रित करणे - नवरात्रीत पहिल्या दिवशी सकाळी पंचामृत मध्ये ठेवून नंतर गंगाजल ने स्वछ करून देवीसमोर लाल कपड्यात ठेवणे आणि "ॐ ह्रीं नमः” १००८ जप करणे .
जप पूर्ण झाल्यावर २१ गोमती चक्रांना फक्त हळद वाहून श्रीसूक्तम् चे पठण करणे. नंतर त्याच कपड्यात बांधून पूर्ण ९ दिवस देवीसमोर ठेवणे आणि नंतर लॉकर किंवा कॅशबॉक्स मध्ये ठेवणे.
गर्भपात होत असेल तर
२ गोमती चक्र घेऊन श्री गणेश गर्भ रक्षा मंत्र जप १०८ वेळा करून महिलेच्या कंबरेला बाळंतपण पूर्ण होई पर्यंत बांधून ठेवणे. सदर महिलेने रोज किमान १ माळ श्री गणेश गर्भ रक्षा मंत्र जप पूर्ण ९ महिने म्हणजे बाळाचा जन्म होई पर्यंत करणे आवश्यक आहे.
मंत्र - " रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्य रक्षकं। भक्तानाम भयं कर्ता त्राता भव भवार्णवात्॥ "
लग्न होण्यासाठी (फक्त नवरात्री मध्ये कोणत्याही दिवशी )
साहित्य - १ नारळ , ९ कॉइन , ९ हळदीच्या गाठी, लाल कापड, चार मुखी मातीचा दिवा किंवा चार मुखी गहू पिठाचा दिवा , कुंकू.
लाल कपड्यात सर्व सामान ठेवणे त्यावर कुंकू / रोली अर्पण करून दिवा लावणे , नवरात्रीत देवी समोर ठेवणे , मनातली इच्छा बोलून दुर्गा मंदिरात संध्याकाळी ठेवून येणे .
रोली - हळद आणि चूना एकत्र करून बनवलेले कुंकू (प्राचीन वैदिक पध्दत)
फसलेले पैसे मिळण्यासाठी (नवरात्री किंवा कोणत्याही शुक्रवारी )
मंगळवारी आणि बुधवारी पैसे देऊ नये तसेच राहू केतू दशा असताना देऊ नये
साहित्य - ११ लवंग, भोज पत्र किंवा सफेद पेपर, १ कापूर, ४ मुखी तुपाचा गव्हाचा दिवा.
कपूर आणि लवंग जाळणे, त्यापासून तयार काजळी ने भोजपत्र किंवा सफेद पेपर वर त्या व्यक्तीचे नाव लिहिणे (एका चिट्ठीवर एक नाव) लिहून ते एका जड सामानाखाली दाबुन ठेवणे. ४ मुखी तुपाचा गव्हाचा दिवा लावून १ माळा मंत्र जप करणे.
- "या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥”
गर्भधारणासाठी (नवरात्रीत (४ किंवा ५ दिवशी) नंतर कोणत्याही शुक्रवारी
केसर, हळद कुंकू एकत्र करावे , १ कलावा घेऊन देवी समोर तुपाचा दिवा लावणे आणि कलाव्याला केसर हळद कुंकू मिश्रण लावणे, महिलेच्या डाव्या बाजूला बांधताना मंत्र ११ वेळा बोलणे. नंतर मंत्र रोज १ माळ महिलेने करावी.
मंत्र -" ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते "
दुर्गा मंदिरात जाऊन देवीच्या पायाला धागा लावून ११ वेळा मंत्र बोलून मग बांधावा .
थांबलेलं काम / कोर्ट केस साठी (शिव मंदिर) जिथे तिन्ही एकत्र असतील असं मंदिर
साहित्य - दुर्वा , २ बेल , अख्खे तांदूळ , सफेद चंदन, कुंकू
एका बेलपत्राला चंदन लावून त्यावर तांदूळ ठेवून ते पिंडीवर ठेवणे नंतर
दुर्वा - श्री गणेश, १ बेल आणि कुंकू पार्वती देवीला अर्पण करणे आणि इच्छा बोलणे.